नवी दिल्ली- आपल्या मुलीचे आयुष्य सुखात जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. जर ती वयाच्या 18 व्या वर्षी करोडपती झाली तर असा विचारही अनेकांना कठीण वाटतो. पण तुम्ही जर योग्य रितीने गुंतवणूक केली तर हे शक्य आहे. जाणकार याला स्टेपअप गुंतवणूक योजना असे म्हणतात.
काय आहे स्टेपअप गुंतवणूक योजना
स्टेपअप गुंतवणूक योजनेत दरवर्षी एका ठराविक टक्क्याने गुंतवणूक वाढविण्यात येते. जर 10 टक्क्यांची स्टेपअप गुंतवणूक योजना आहे तर यात तुम्हाला दरवर्षी 10 टक्के वाढ करावी लागते. समजा तुम्ही पहिल्या वर्षी दरमहा 1000 रुपये गुंतवणूक करत आहात तर तुम्हाला पुढील वर्षी 1100 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यांच्या पुढील वर्षी ही गुंतवणूक वाढवून तुम्हाला 1210 रुपये करावी लागेल. अशा रितीने ही गुंतवणूक दरवर्षी वाढत जाईल.
कशी होईल तुमची मुलगी करोडपती
तुमच्या मुलीचा जन्म होताच तुम्ही 5500 रुपयांची गुंतवणूक इक्विटी म्युचुअल फंडात करा. त्यानंतर दरवर्षी त्यात 10 टक्के वाढ करा. यासाठी सोपा उपाय हा म्युचअल फंडात SIP सुरु करणे हा आहे. याचा फायदा असा आहे की, तुम्ही गुंतवणूक वाढवून दरवर्षी त्याच फंडात एक वर्षाची सिप सुरु करु शकता. अशा रितीने तुम्ही 18 वर्ष गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलीचा एक कोटीचा निधी तयार होईल.
गुंतवणूक योजनेवर एक नजर
- 5500 रुपयांपासून गुंतवणूकीला सुरुवात करा.
- तुम्ही करत असलेल्या गुंतवणूकीत दरवर्षी दहा टक्के वाढ करा.
- 18 वर्षे अशा रितीने गुंतवणूक करत राहा.
- या गुंतवणूकीवर तुम्हाला 15 टक्के परतावा मिळणे अपेक्षित आहे.
- अशा रितीने गुंतवणूक करुन तुम्ही एक कोटीची निधी उभारणी करु शकता.

No comments:
Post a Comment