Pages

Wednesday, June 27, 2018

हीच बायको नको, पत्नी पीडित पुरुषांच्या पिंपळाला फेऱ्या

सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहिता वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. मात्र औरंगाबादच्या काही पुरुषांनी हीच बायको मिळू नये यासाठी अनोखं आंदोलन केलं.
सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहिता वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. मात्र औरंगाबादच्या काही पुरुषांनी हीच बायको मिळू नये यासाठी वडाच्या झाडाऐवजी पिंपळाच्या झाडाला दोरा घेऊन फेरी मारत अनोखं आंदोलन केलं. आंदोलनकर्ते पुरुष पत्नी पीडित संघटनेचे कार्यकर्ते आहेत.
बायकोच्या जाचाला कंटाळून औरंगाबादच्या पुरुषांनी हे हटके आंदोलन केलं आहे. बायकोपासून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी सर्व पुरुषांनी पिंपळाच्या झाडाजवळ यमाला विनंती करत पूजा केली. हे सर्व पुरुष पत्नीने दाखल केलेल्या केसेसमुळे वैतागलेले आहेत.
वटपौर्णिमेच्या एक दिवस आधीच यांनी हे आंदोलन का केलं? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. त्याचं कारणही मजेशीर आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी यमराज व्यस्त असतील, त्यामुळे त्यांनी वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी आंदोलन केलं. तसेच पिंपळाच्या झाडाखाली मुंजा राहतो म्हणून त्यांनी आंदोलनासाठी वडाच्या झाडाऐवजी पिंपळाच्या झाडाची निवड केली.

No comments:

Post a Comment

Deals today

New Campaigns 1) Furo Sports CPS -  https://www.cuelinks.com/ campaigns/furo-sports- affiliate-program#3700 2) Cipla Immuno Boosters C...