Pages

Wednesday, June 27, 2018

दाल-चावल विक्रेत्याने शोधला प्लास्टिकला पर्याय

सोलापूर - प्लास्टिक बंदीचा सर्वाधिक फटका छोट्या-मोठ्या उद्योजकांना बसला आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणाऱ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यवसाय निम्म्यावर आले आहेत. यावर सोलापुरातील आसरा चौकातील दाल-चावल विक्रेते मोहम्मद हमीद शेख यांनी शक्‍कल लढविली आहे. त्यांनी दालसाठी बाटलीचा तर चावलसाठी बटर पेपरचा वापर सुरू केला आहे.
पर्यावरणाच्यादृष्टीने प्लास्टिक बंदी करणे आवश्‍यकच आहे. परंतु, प्लास्टिक बंदी करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करायला हव्या होत्या, त्याचा अभाव सध्या दिसून येतो. त्यामुळे व्यापाऱ्यांसह, कापड दुकानदार, किराणा दुकानदार तसेच लहान-मोठ्या उद्योजकांमधून नाराजीचा सूर निघत आहे. मटन विक्रेते, हॉटेल व्यवसायिक, दाल-चावल विक्रेते, मिठाई विक्रेते यांच्यासह अन्य व्यावसायिकांचे प्लास्टिक बंदीमुळे मोठे नुकसान होत आहे. सध्या बाजारात प्लास्टिक बंदीमुळे व्यावसायिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरल्याने दंड करण्याऐवजी सर्वप्रथम संबंधित व्यवसायिकाला वॉर्निंग देण्याची गरज आहे. परंतु, थेट दंड आकारला जात असल्याने बहुतांश उद्योजकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याच्या भावना लघुउद्योजकांनी व्यक्‍त केल्या.
कापडी पिशव्यांचे दर वाढले
कापडी पिशव्यांचे प्लास्टिक बंदीपूर्वीचे दर आणि सध्याचे दर, यात मोठी तफावत दिसून येत आहे. आता कापडी पिशव्यांचे दर १० ते १५ रुपयांवरून २५ ते ६० रुपयांपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वस्तू पिशव्यांऐवजी हातात आणाव्या लागत आहेत.

No comments:

Post a Comment

Deals today

New Campaigns 1) Furo Sports CPS -  https://www.cuelinks.com/ campaigns/furo-sports- affiliate-program#3700 2) Cipla Immuno Boosters C...