Pages

Saturday, June 23, 2018

1 महिने खा मधात भिजलेले 3 बादाम, या 6 समस्‍या होतील दूर

हेल्‍थ डेस्‍क- आयुर्वेदमध्‍ये बादाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्‍या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र यांना एकत्रित खाल्‍ल्‍याने अनेक फायदे मिळू शकतात.

भोपाळचे आयुर्वेदिक एक्‍सपर्ट डॉ. अबरार मुल्‍तानी सांगतात की, हे दोन्‍ही पदार्थ अत्‍यंत लाभदायी औषधी आहेत. यांमध्‍ये भरपूर पोषक तत्‍त्‍व असतात. यांच्‍यामध्‍ये अँटीऑक्‍सीडंट, अँटीबॅक्‍टेरिअल आणि अँटीएजिंग गुणधर्म असतात. आपण जर 1 महिना रोज मधात भिजलेले 3 बादाम खालले तर त्‍यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्‍ही मधामध्‍ये बादामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बादाम आणि मध दोन्‍ही एकत्रितपणे खाऊ शकता.
पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, हे दोन्‍ही पदार्थ ए‍कत्रित खाल्‍ल्‍याने कोणकोणते फायदे मिळतील...

1) यांच्‍या सेवनाने कोलेस्‍ट्रॉल कमी होईल तसेच ह्रदयही हेल्‍दी राहिल.
2) मेंदूसाठी हे एक टॉनिक आहे. यामुळे स्‍मरणशक्‍ती तल्‍लख राहते.

3) एजिंगला थांबवते व स्किन हेल्‍दी ठेवते.
4) त्‍यांच्‍या अँटीअॅलर्जिक आणि अँटीबॅक्‍टेरिअल गुणांमुळे घशाचे आणि फुप्‍फुसाचे आजार दूर राहतात.

5) प्रोटीनचा उत्‍तम सोर्स असलयामुळे स्‍नायू मजबूत आणि सशक्‍त बनतात. यामुळे अशक्‍तपणा दूर होतो.
6) केसांना मजबूत ठेवण्‍यासोबतच डोळ्याची शक्‍तीही वाढवतात.

No comments:

Post a Comment

Deals today

New Campaigns 1) Furo Sports CPS -  https://www.cuelinks.com/ campaigns/furo-sports- affiliate-program#3700 2) Cipla Immuno Boosters C...